Jejuri Malhar Certificate Nitesh Rane : मल्हार सर्टिफिकेशनमध्ये 'मल्हार' नावाला जेजुरीकरांचा विरोध

मल्हार सर्टिफिकेशन झटका मटणाच्या योजनेला जेजुरीकरांचा विरोध, नितेश राणे यांची भेट घेऊन खंडोबाच्या प्रतीमाने सन्मानित केले.

राज्यतील मटनाला हलाल मटना प्रमाणे झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटल होत. यानंतर श्री मार्तंड देव संस्थान खंडोबा मंदिर जेजुरी सर्व विश्वस्त मंडळाने 'मल्हार सर्टिफिकेशन झटका मटण' या योजनेला देव संस्थान विश्वस्त मंडळाचा ठराव बहुमताने मंजूर करून पाठिंबा दिला.

तसेच नितेश राणे याची भेट घेऊन खंडोबाची काठी, घोंगडी,पगडी व खंडोबा देवाची प्रतिमा देऊन जेजुरी विश्वस्तानी सन्मान केला. मात्र जेजुरीतील नागरिकांनी या नावाला विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थ,पुजारी, खांदेकरी सेवेकरी आणि माजी विश्वस्त यांनी या नावाला विरोध असल्याचं म्हटल आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com