‘जिंदाल’मधील आग अजूनही अजूनही धूमसतीच
Admin

‘जिंदाल’मधील आग अजूनही अजूनही धूमसतीच

इगतपुरीच्या मुंढेगाव येथे असेलेल्या जिंदाल कंपनीत ही लागली होती ती आग 22 तासानंतर अद्यापही धूमसतेच आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

इगतपुरीच्या मुंढेगाव येथे असेलेल्या जिंदाल कंपनीत ही लागली होती ती आग 22 तासानंतर अद्यापही धूमसतेच आहे. अग्निशमन दलाचे जवान अजूनही शर्तीचे प्रयत्न करत असून अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. बॉयलरमुळे ही लागली नाही असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अशातच केमिकलचे बॅरल असल्याने स्फोट झाल्याने ही आग भडकली आहे. अद्यापही परिसरात धुराचे लोळ दिसून येत आहे.

या आगीच्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून तिघाची प्रकृती गंभीर असून 17 जण जखमी आहेत. याशिवाय कंपनीत एवढी भीषण आग कशी लागली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणार असली तरी 22 तास उलटून गेले तरी अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.

नाशिक-मुंबई महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला हे धुराचे लोळ नजरेस पडत आहे, त्यामुळे कंपनीला लागलेली भीषण आग पाहता ही आग नेमकी कशामुळे लागली असावी याचे कारण अजून समोर आलेले नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इगपुरीमध्ये येऊन आगीच्या घटनास्थळी पाहणी केली होती, त्यामध्ये मृतांना पाच लाखांची मदत जाहीर केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com