Jitendra Awhad : 'वाल्मिक कराड याने 'प्लॅनिंग' करून केले...', जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

Jitendra Awhad : 'वाल्मिक कराड याने 'प्लॅनिंग' करून केले...', जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्यावर 'प्लॅनिंग' करून खून केल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील गुन्हेगारी आणि कराड यांच्या दहशतीवर आव्हाड यांचे भाष्य.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्या बाबत एक मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. तसेच, बीडमधील गुन्हेगारी आणि वाल्मिक कराड यांच्या दहशतीवर भाष्य केले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी हत्या केली, असे मी म्हणत नाही. परंतु 100 टक्के सांगतो, वाल्मिक कराड हा याचा 'प्लॅनर' आहे. गेली दहा वर्षांतले जे काही खून झाले आहेत, ते 80 टक्के खून हे वाल्मिक कराड याने 'प्लॅनिंग' करून केले आहेत', असा दावा करत आमदार आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली.

"संतोष देशमुख यांची हत्या सर्वसामान्यांना सरकारविषयी चीड आणणारी आहे. यातून सरकारची बदनामी होत आहे. असे असताना यात काहींना वाचवण्यात येत आहे, हे घृणास्पद आहे", असा घणाघात आमदार आव्हाड यांनी केला.

"मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत नाही. याबाबत सीएम देवेंद्र फडणवीस यांना विचारा. या प्रकरणात फक्त सरकारची बदनामी होत आहे. सर्वसामान्यांच्या मनात, हत्येबद्दल प्रचंड चीड आहे. एवढी घृणास्पद प्रकारानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com