जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस गोपनीय विभागाची नजर

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस गोपनीय विभागाची नजर

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस गोपनीय विभागाची नजर, पत्रकार परिषदेदरम्यान पोलीस घरात घुसल्याने आव्हाड संतापले
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या एसबी पोलीस गोपनीय विभागची नजर असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरात सुरू होती. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत? पत्रकार परिषद सुरू असतानाच आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवावा असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घरात का घुसले? आसा सवाल आव्हाडांकडून पोलिसांना करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com