वाढदिवसाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला डिवचले; 50 खोके एकदम ओके लिहिलेला केक कापल्याने चर्चानं उधाण

मुंब्रा मधील काही नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांनाच जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा मधील गद्दार फॅमिली गेल्याने मला काहीही फरक पडत नसल्याचे म्हंटले होते.आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंब्रा येथील स्थानिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो केक कापण्यात आला त्यावर गद्दार फॅमिली ,50 खोके एकदम ओके.खोके बोके..माजलेत बोके अशा आशयाचे मेसेज लिहिलेले होते.

विशेष म्हणजे वाढदिवस जरी कार्यकर्त्याचा असला तरी केक मात्र आव्हाडांनी कापला आणि त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही वाढदिवस आहे. जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com