वाल्मिक कराडने वापरलेली ती गाडी कुणाची?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच यासंबंधी एसआयटी समितीची स्थापना ही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणातील ३ आरोपी फरार असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. यानंतर आता विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मानला जाणारा अटकेत असलेला वाल्मिक कराड दोन दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण आला आहे. कराड ज्या गाडीतून पोलिसांना शरण आला त्यावरून आता धक्कादायक दावा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मध्यरात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वाल्मिक कराडच्या गाडीबाबत खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीड जिल्ह्यातील मस्साजोग या सरपंच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा वाल्मिक कराड ज्या गाडीतून त्यांना शरण आला त्यांच्या ताफ्यात ही गाडी होती. त्यावरुन जितेंद्र आव्हांड यांनी सवाल उपस्थित केला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी वाल्मिक कराड याने शरण येताना ज्या गाडीचा वापर केला होता ती गाडी अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचा आरोप केला असल्याचा दाखला ही दिला आहे. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा-
जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वाल्मिक कराड प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचे निकाल स्पष्टपणे सांगतात की, जर एखाद्या महत्वाच्या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करायचे असेल तर त्याला व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे देखील हजर करता येऊ शकते. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याला केजला नेण्यात आले. वाल्मिक कराड हा पुण्यात सरेंडर होणार, हे सबंध महाराष्ट्राला माहित होते. वाल्मिक कराडला कधी केजला नेणार, हेदेखील लोकांना माहित होते. त्यामुळेच पुणे आणि केज येथे अराजकता माजवण्यासाठी हजारो लोकं तयार ठेवली होती. म्हणजेच, एवढी अराजकता आणि एवढी दहशत मला वाटत नाही, मुंबईच्या गँगवाॅरमध्येही कुणी माजवली असेल!”
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा-
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-