ताज्या बातम्या
Jitendra Awhad On Donald Trump : "....राजकीय नाही, तर व्यावसायिक"; भारत- पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबाबत आव्हाडांचा ट्रम्पला टोला
डोनाल्ड ट्रम्प: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर आव्हाडांचा व्यावसायिक टोला
भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "आमच्यासाठी कोण डोनाल्ड ट्रम्प? ते आमच्या देशाची दिशा ठरवणार का? आम्ही त्यांना राजकीय देखील मानत नाही. डोनाल्ड ट्रम्प हा राजकीय नाही, तर व्यावसायिक आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्या गतीने पुढे चालत आहेत. अजून 5 वर्षांनी भारतीयांना अमेरिकेत राहणं मुश्लिक होऊन जाईल.