मारूतीने निर्णय घेतला आहे, की चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही ह्यावर चर्चा करणार - जितेंद्र आव्हाड

मारूतीने निर्णय घेतला आहे, की चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही ह्यावर चर्चा करणार - जितेंद्र आव्हाड

पुण्यात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचे कोणतेही देव बॅचलर नाहीत. आमचे कोणतेही सेलिब्रिटी बॅचलर नाहीत. जगून सर्व काही करता येते. सर्व्ह करू शकता. जगात असा एकही माणूस नाही ज्याचे रक्त हिरवे किंवा निळे नाही. देवाने भेद केला नाही. तो सर्वांशी शेअर करून पाठवला. सर्वांना भगवंताने दोन डोळे, दोन कान आणि एकच शरीर दिले आहे. असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे, आव्हाड म्हणाले की, “आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत दादांनी म्हणताच इंद्रलोकात भुवया उंचावल्या व सगळ्यांनी मारुतीकडे बघायला सुरुवात केली व मारुतीला चंद्रकांत दादांचं म्हणणं ऐकवलं. मारूतीने निर्णय घेतला आहे, की लवकरच चंद्रकांत दादांची भेट घेऊन ते बॅचलर आहेत की नाही ह्यावर सविस्तर चर्चा करणार,” असे आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com