म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन...; जितेंद्र आव्हाडांनी लगावला टोला

म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन...; जितेंद्र आव्हाडांनी लगावला टोला

एनसीईआरटीनं अभ्यासक्रमातील 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच काढून टाकला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

एनसीईआरटीनं अभ्यासक्रमातील 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच काढून टाकला आहे. मनुष्यप्राणी माकडापासून मनुष्य हळूहळू उत्क्रांत होत गेला हा डार्विनचा सिद्धांत काही घटकांकडून नाकारण्यात येत आहे. डार्विनच्या या सिद्धांताला आधीच भारतातील काही समाजघटकांकडून विरोध होत आहे. अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातून चार्ल्स डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत वगळल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे की, चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झाले ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका. म्हणजे बुद्धीप्रामाण्य वाद हा आता संपल्यात जमा. म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील.ह्या बदल आम्हाला मान्य नाही असे पत्रक देश भरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. विरोध केला जातोय हे कौतूकास्पद आहे. असे आव्हाड म्हणाले. त्यांनी हे ट्विट करुन जोरदार टोला लगावला असून त्यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com