Jitendra Awhad on MahaYuti : "मालाडचा वाद सरकारने पेटवला"
आज ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यांनी मालाड वादावर सरकारला खडेबोल सुनावले. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मालाडचा वाद सरकारने पेटवला आहे. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म (state sponsored terrorism) राज्यवस्था पुरस्कृत राजकारण सुरु आहे. महायुतीचे नेते हालाल आणि झटकावर बोंबलत फिरत होते. मी विधानसभेत मागणी केली होती. की, महाराष्ट्रात झटक्याची दुकाने किती आहेत त्याची यादी द्या. आपण लहानपासून आपण काय खातो? हे आपल्याला माहिती नाही. जे हलाल आणि मटणाबद्दल बोलत होते. त्यांना विचारा तुम्ही कुठले मटन खात आहात?. सध्याच्या सरकारला फक्त आग लावायची होती. दंगली पेटवायच्या होत्या. महाराष्ट्राला गुजरातच्या मार्गाने न्यायचे आहे. कोर्टाने राज्यव्यवस्थेला झापले आहे. व्हिडिओ करून बॉम्ब ब्लास्ट केला त्यामध्ये पोरांची आयुष्य बरबाद झाली आहे. गावागावातली वातावरण खराब करण्याचे काम हे सरकार करत आहे. आम्ही पिक्चरमध्ये पाहून जर समजला तर बालिश आहेत." असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हटले आहे.
नेमंक प्रकरण काय?
काल गुढीपाडव्याच्यानिमित्ताने संध्याकाळी कलश शोभायात्रा निघत असताना, दोन तरुण मागे राहिले होते. त्यामुळे ते रिक्षामधून जात असताना त्यांच्या हातात दोन भगवे झेंडे होते. ते जात असताना जय श्रीरामचे नारे बोलत जात होते. त्यामुळे इतर समाजाच्या लोकांनी त्यांचा आवाज ऐकून त्या रिक्षाला थांबून त्यांच्यावर शिवीगाळ केली.
इतकंच नव्हे तर त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला ज्यामध्ये ते दोन्ही तरुण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्या तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आहेत. ज्या लोकांनी त्या तरुणांना मारलं त्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्या आरोपीचं नाव अर्शान शेख असून इतर आरोपींचा तपास सुरु आहे.