जितेंद्र आव्हाडांची रुपाली ठोंबरेंविरोधात तक्रार दाखल; कारण काय?

जितेंद्र आव्हाडांची रुपाली ठोंबरेंविरोधात तक्रार दाखल; कारण काय?

जितेंद्र आव्हाडांनी रुपाली ठोंबरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. व्हायरल चॅटमुळे बीडच्या मूक मोर्चात जाण्याआधीच्या चर्चेचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Published on

राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी जितेंद्र आव्हाडांची कथित चॅट व्हायरल केलीय. याच जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या मूक मोर्चात जाण्याआधी चॅट केल्याचं या व्हायरल चॅटमधून कळतंय. 'सरपंच देशमुखांच्या कुटुंबासाठी आले होतात की आग लावायला?'. असा सवाल रुपाली ठोंबरेंनी आव्हाडांना ट्विट करत केला. यावरच जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत ट्वीट केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट

बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट माॅर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असूनदेखील सत्य - असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट व्हायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला?

असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर, राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदविलेला आहे.

ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे. तो शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्या कराडने जंगजंग पछाडले. शिवराज बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलीसही त्याच्यावर पटापट गुन्हे नोंदवितात. सर्वात हास्यास्पद गुन्हा म्हणजे, शिवराज बांगर याने वाल्या कराडकडून खंडणी मागितली, आहे की नाही विनोद !

रुपाली ठोंबरे यांनी केलेले ट्वीट

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com