अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील आता वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील आता वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

राहुल सोलापूरकर म्हणाला की, वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात, असं वक्तव्य केलं आहे. आता या नव्या वक्तव्यामुळे सोलापूरकर याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. त्यामुळे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही.

आता तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com