जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का, तीन नेत्यांनी सोडली साथ

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजीत पवार, हेमंत वाणी आणि सीमा वाणी यांनी आव्हाडांची साथ सोडली आहे. प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे एकेकाळचे खंदे कार्यकर्ते आनंद परांजपे यांच्यानंतर आता अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी देखील आव्हाडांची साथ सोडली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com