जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजपाच्या या नेत्याचे  धक्कादायक विधान

जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजपाच्या या नेत्याचे धक्कादायक विधान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या निषेधार्थ काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये इनाम देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.यावर रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण, अर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिलशाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com