JJ Hospital resident doctors strike Back
JJ Hospital resident doctors strike BackTeam Lokshahi

JJ Hospital Case: जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

JJ Hospital Case: जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे
Published by :
shweta walge
Published on

मुंबईतील जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. गेल्या ४ दिवसांपासून जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर होते. आज त्यांनी आपला हा संप मागे घेतला आहे. डॉ. रागिणी पारेख आणि तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करावे, ही मागणी निवसी डॉक्टरांकडून करण्यात आली होती. डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेतला आहे. संपात सामील झालेले निवासी डॉक्टर आजपासून कामावर रुजू होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com