जेएनपीटी ते पुणे प्रवास होणार सुसाट

जेएनपीटी ते पुणे प्रवास होणार सुसाट

जेएनपीटी ते पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जेएनपीटी ते पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे. जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई-पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत २९.१५ किमी लांबीचा नवा सहापदरी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा पुण्यासह कर्जत-खोपोली परिसरालाही लाभ होणार आहे.

हरित महामार्गाची निविदा प्रक्रिया नॅशनला हायवे अॅथोरिटीने सुरू केली आहे. या महामार्गावर टोल असणार आहे. या महामार्गाचे काम विविध टप्यात सुरू केले आहे. चिलेंपासून ते गव्हाणफाट आणि पळस्पेफाटा ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत ७.३५ किलोमीटर लांबीचा असा एलिव्हेटेड कॉरिडॉर असून त्यावर १३५१.७३ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात जेएनपीए बंदरातून होणाऱ्या अवजड मल्टिएक्सल कंटेनर ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारी चाहतूककोंडी आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरील ताण कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. या महामार्गावर टोल असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com