Jodha Akbar Rajat Tokas : छोट्या पडद्यावरील 'अकबर' एक वर्षापासून बेपत्ता! 'त्या' दुर्घटनेनंतर सगळ्यांशी तोडला संबंध, नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड असो किंवा छोटा पडदा, अनेक कलाकार काही काळासाठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पण अचानक असे काही कलाकार प्रकाशझोतातून गायब होतात आणि त्यांचा कुठे ठावठिकाणा लागत नाही. असाच प्रकार सध्या ‘जोधा अकबर’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता रजत टोकस याच्या बाबतीत घडला आहे.
छोट्या पडद्यावर ‘अकबर’ची भूमिका साकारत रजत टोकसने अपार लोकप्रियता मिळवली होती. त्याचा अंदाज, स्टाईल आणि अभिनय पाहून प्रेक्षक वेडे झाले होते. पण गेल्या सहा वर्षांपासून रजत कोणत्याही मालिकेत दिसलेला नाही. शेवटचं त्याचं दर्शन ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकेत एका सहाय्यक भूमिकेत झालं होतं.
2019 मध्ये रजतने सोशल मीडियावर एक मोहिम सुरू केली होती. त्याने थेट मार्वल्स निर्मात्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याला ‘वॉल्वरिन’च्या भूमिकेसाठी कास्ट केलं जावं. चाहत्यांनी या मोहिमेला मोठ्या प्रमाणात साथ दिली. मात्र, या स्वप्नाला यश लाभलं नाही आणि रजतला निराशा हात लागली.
2023 मध्ये रजतचा इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याने तो काही काळ सोशल मीडियापासून दूर गेला होता. त्यानंतर त्याने परत हजेरी लावली खरी; पण 19 जुलै 2024 रोजी केलेली पोस्ट हीच त्याची शेवटची ठरली. त्यानंतर आजपर्यंत त्याचा कुठलाही अपडेट समोर आलेला नाही.
रजतच्या अचानक गायब होण्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध थिअरीज मांडायला सुरुवात केली आहे. काहींचं म्हणणं आहे की आता त्याला चांगल्या व लीड भूमिका मिळत नाहीत. तर काहींच्या मते तो आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी इंडस्ट्रीपासून दूर गेला आहे.
रजत टोकसने 2015 मध्ये आपल्या दीर्घकाळच्या प्रेयसी सृष्टिसोबत लग्न केलं होतं. विशेष म्हणजे ही लग्नसोहळा अतिशय गुप्तपणे पार पडला होता. इंडस्ट्रीतल्या सहकाऱ्यांना याची कुठलीच खबर लागली नव्हती.
सध्या रजत टोकस ना सोशल मीडियावर सक्रिय आहे, ना छोट्या पडद्यावर. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘टीव्हीचा अकबर’ पुन्हा कधी छोट्या पडद्यावर झळकणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.