Kolhapur Joint Wheel Cradle Stuck : कोल्हापूरात जॉइंट व्हील पाळणा हवेतच अडकला! तब्बल 4 तास चालला सुटकेचा थरार; अडकलेल्या 18 जणांचा जीव....

Kolhapur Joint Wheel Cradle Stuck : कोल्हापूरात जॉइंट व्हील पाळणा हवेतच अडकला! तब्बल 4 तास चालला सुटकेचा थरार; अडकलेल्या 18 जणांचा जीव....

कोल्हापूरच्या कागल इथ सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात उभारण्यात आलेला जॉइंट व्हील नावाचा पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकला.
Published by :
Prachi Nate
Published on

कोल्हापूरच्या कागल इथ सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात उभारण्यात आलेला जॉइंट व्हील नावाचा पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकला. या पाळण्यात बसलेले 18 जण 80 फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले.

रात्री 08.30 वाजता हे पाळण्यात बसले होते. कोल्हापूरातून मनपा फायर ब्रिगेडसह रेस्कू टिम कागलच्या दिशेने तात्काळ रवाना झाल्यानंतर, रात्री 11.30 पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने अडकलेल्या 18 जणांना एका एका करुन खाली घेण्यास सुरुवात केली.

रात्री 12.30 वाजता सर्व जण सुखरूप खाली आले. यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण कागल, कणेरी मठ, गोकुळ शिरगाव येथील होते. सुटकेचा हा थरार तब्बल चार तास चालला. रात्री 12.48 मिनिटांनी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं.

कोल्हापूर महापालिका अग्निशामक पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची टीम संयुक्तरित्या हे ऑपरेशन पूर्ण केले. जॉईंट व्हील पाळणा उंचावर अडकल्याने अनेक नागरिक पाळण्यात अडकून पडले, यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. तर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com