ताज्या बातम्या
Chief Justice Surya kant : न्यायमूर्ती सूर्यकांत बनले देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचाकाल (दि.23 नोव्हेंबर) रोजी कार्यकाळ संपला.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचाकाल (दि.23 नोव्हेंबर) रोजी कार्यकाळ संपला. भूषण गवई यांनी निवृत्ती घेतल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे नवे सरन्यायाधीश बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना शपथ दिली. सात देशांच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. सूर्य कांत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.
