ज्योती मेटे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

ज्योती मेटे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

ज्योती मेटे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

ज्योती मेटे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यातच आता ज्योती मेटे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज पक्षप्रवेश होणार आहे. ज्योती मेटे शिवसंग्राम संघटना महायुतीची साथ सोडत महाविकास आघाडीत सहभागी होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com