विठ्ठलाच्या दर्शनाने करणार सुरुवात; कसा आहे KCR यांचा दौरा

विठ्ठलाच्या दर्शनाने करणार सुरुवात; कसा आहे KCR यांचा दौरा

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच आता ते पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत.

केसीआर सोलापूरहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. चंद्रशेखर राव विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची शक्यता आहे. आज ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करणार आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते आपल्या दिवसाची सुरूवात करणार आहेत.

त्यानंतर ते 1:30 वाजताच्या सुमारास केसीआर सरकोली गावातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघतील. 3:30 वाजता ते तुळजापूरमध्ये दाखल होतील आणि तुळजाभवानीचं दर्शन-पूजा करतील. तर आज दुपारी 4:30 वाजता केसीआर आपला दौरा आटोपून हैदराबादकडे रवाना होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com