तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची उद्या नांदेडमध्ये सभा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची उद्या नांदेडमध्ये सभा

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची उद्या नांदेडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची उद्या नांदेडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘बीआरएस’ ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता फक्त तेलंगण राज्यापुरते मर्यादित न राहता देशभरात पक्षाचा प्रचार, प्रसार व्हावा, यासाठी नियोजन सुरू केले आहे. ते लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या सीमेवरील नागरिकांनीही तेलंगणच्या धर्तीवर आम्हाला सुविधा द्या किंवा आमच्या भागाचा समावेश त्या राज्यामध्ये करा, अशी मागणी केली होती.

शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे 15 जानेवारी रोजी होणारी सभा रद्द झाली होती. नांदेडमधील नवीन मोंढा मैदानात सभा पार पडणार आहे. पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात आला आहे. त्याच पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे.

पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, तेलुगू भाषिक लोकसंख्या इतर राज्यांमधील लोकसभेच्या जवळपास 30 जागांच्या निकालांवर परिणाम करू शकते. त्यात कर्नाटकातील 40 विधानसभा आणि 14 लोकसभेच्या जागा, महाराष्ट्रातील 22 विधानसभा आणि 8 लोकसभेच्या जागा, छत्तीसगडमधील 12 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागा, 18 लोकसभा जागांवर तेलगू भाषिक लोक प्रभाव दाखवू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com