तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वादळ महाराष्ट्रात येणार; 'या' ठिकाणी महासभेचं आयोजन

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वादळ महाराष्ट्रात येणार; 'या' ठिकाणी महासभेचं आयोजन

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आणखी तीन सभा घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आणखी तीन सभा घेणार आहेत. नांदेडची सभेनंतर केसीआर महाराष्ट्रात आणखी तीन सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि ओडिशामध्ये शिरकावाचा प्रयत्न आहे. पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, तेलुगू भाषिक लोकसंख्या इतर राज्यांमधील लोकसभेच्या जवळपास 30 जागांच्या निकालांवर परिणाम करू शकते.

दलित, ओबीसीसह इतर मागास समाजांवर केसीआर यांच्या पक्षाची मदार आहे. तेलंगाणात हाच मतदार काँग्रेससोबत होता आणि आता तोच मतदार बीआरएससोबत आहे. कर्नाटकातील 40 विधानसभा आणि 14 लोकसभेच्या जागा, महाराष्ट्रातील 22 विधानसभा आणि 8 लोकसभेच्या जागा, छत्तीसगडमधील 12 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागा, 18 लोकसभा जागांवर तेलगू भाषिक लोक जादू दाखवू शकतात.

महाराष्ट्रातील तेलंगाणा सीमाभागातील किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यातील गावांमध्ये बैठका होतील. नांदेडनंतर महाराष्ट्रातली दुसरी सभा थेट शिवनेरी किल्ला परिसरात होणार आहे.नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या काही गावांनीही ठराव केले होते. त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली होती. केसीआर यांचा पक्ष आधी तेलंगाणा राष्ट्र समिती होता. त्याचंच नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com