Sangli Kalbhairav : श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार; गुलालाची उधळण आणि चांगभलचा गजर !
पश्चिम महाराष्ट्रात यात्रेची परपंरा हजारो वर्षापासून सुरु आहे. यात्रेच्या निमित्ताने गावकरी एकत्र येऊन गावात झालेले वाद मिठवतात. सांगलीमध्ये नुकतीच काळभैरव यात्रा पुर्ण झाली. या ३ दिवसीय यात्रेमध्ये गुलालाची उधळण पाहायला मिळाली. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र- कर्नाकटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या जत तालुक्यातील, बिळूरमधील ग्रामदेवत श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. तीन दिवसीय यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी पार पडले. यावेळी गुलालाची उधळण आणि चांगभलच्या गजरात गावातून मिरवणूकही काढण्यात आली होती.
या यात्रेच्या पाहिल्या दिवशी चांगभल गजर करत गुलालाची उधळण करण्यात येते. दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य दिला जातो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी वाळू ओढ्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडतो, अशी माहिती पुजाऱ्यांकडून मिळाली आहे.