कास पठारला 4 हजार पर्यटकांची भेट; सलग सुट्ट्यांमुळे कास पठार बहरले

कास पठारला 4 हजार पर्यटकांची भेट; सलग सुट्ट्यांमुळे कास पठार बहरले

जागतिक वरसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम शनिवारी सुरू झाल्यानंतर दोनच दिवसात तब्बल 4000 पर्यटकांनी कासला भेट दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम शनिवारी सुरू झाल्यानंतर दोनच दिवसात तब्बल 4000 पर्यटकांनी कासला भेट दिली आहे. पर्यटक पठारावर फुलांसोबत, फुलांमध्ये फोटो सेशन करून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सलग सुट्ट्यांमुळेही कास पठार पर्यटकांनी भरले आहे.

कास पुष्प पठारावरील फुले पाहून नवखे पर्यटक आनंदी झाले असून अजून पूर्णपणे हंगाम बहरण्यास काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यात आहे. कास पठाराभोवती लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यामुळे प्राण्यांचा वावर कमी झाल्याने गेल्या काही वर्षांपासून कास पठारावरील फुले कमी प्रमाणात बहरत आहेत.

त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी फुलांना पायदळी तुडवू नये, फुले तोडून वारसास्थळाची हानी करू नये असे आवाहन वन समितीमार्फत करण्यात येत आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून 100 रुपये शुल्क आकारले जात असून कास पुष्प पठारावरील हंगाम सुरू झाल्याने पर्यटनावर आधारित असणाऱ्या शेकडो कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.

कास पठारला 4 हजार पर्यटकांची भेट; सलग सुट्ट्यांमुळे कास पठार बहरले
सातारा शहरासह परिसरात रात्रीपासून कोसळधारा सुरू; कोयना धरणात 100.70 टीएमसी पाणीसाठा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com