Chhagan Bhujbal : महिला सक्षमीकरण करण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : महिला सक्षमीकरण करण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध- छगन भुजबळ

महिला सशक्तीकरण: महायुती सरकार विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध. छगन भुजबळ यांचे प्रतिपादन.
Published by :
Team Lokshahi
Published on

"महिला ही अबला नसून सबला आहे. तिच्या प्रगतीसाठी शिक्षण व धैर्य यांची जोड आवश्यक आहे. महायुती सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत," असे प्रतिपादन NCPचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी आज केला आहे.

महिला व बालविकास विभागाच्यावतीने नाशिक येथील कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात ई-पिंक रिक्षा वितरणासह विविध उपक्रम पार पडले. या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे Aditi Sunil Tatkare, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, विभागीय आयुक्त नयना गुंडे, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, कायनेटिक कंपनीचे रितेश मंत्री, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील तसेच विविध पदाधिकारी, सेविका व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमावेळी छगन भुजबळ म्हणाले की, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यामुळे महिलांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. समाजसुधारणेपासून ते आधुनिक भारताच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अन्यसाधारण आहे. आज महिला सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत.

लाडकी बहीण योजने Ladki Bahin Yojana चा उल्लेख करताना छगन भुजबळ म्हणाले की, काही अडचणी असल्या तरी राज्याचे उत्पन्न वाढल्याने लाभार्थींना दिलासा मिळत आहे. या योजनेतील निधी महिलांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाड्यांसाठी त्यांच्या पालकमंत्री कार्यकाळात निधी उपलब्ध करून देत मुलांसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारल्या गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिकमध्ये तयार करण्यात आलेल्या कलाग्राम प्रकल्पाचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले की, या ठिकाणी महिलांच्या बचतगटांना उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी महिला व बालविकास विभागाने पुढाकार घ्यावा. दिल्ली हाटच्या धर्तीवर उभारलेल्या या प्रकल्पात १०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. सध्याच्या काळातील महिलांची क्षमता अधोरेखित करताना त्यांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ operation sindoor मोहिमेचे उदाहरण दिले. कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगत त्यांनी महिलांच्या नेतृत्वाची स्तुती केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com