मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मांढरदेवच्या काळूबाई देवीची होणार पूजा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मांढरदेवच्या काळूबाई देवीची होणार पूजा

गडावर कोंबड्या,बकरी आणण्यास मनाई, अन्यथा होणार कारवाई.
Published by :
Sagar Pradhan
Published on

प्रशांत जगताप|यवतमाळ: राज्यासह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळुबाई देवीच्या यात्रेतील शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. 5 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान मांढरदेव येथील काळुबाईची वार्षिक यात्रा संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी आढावा बैठक घेऊन सर्व विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या सर्वच विभागांनी योग्य समन्वय साधावा, प्रशासनाच्या कोणत्याच विभागाने हलगर्जीपणा करू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल.असा इशारा देखील वाईच्या प्रांताधिकार्‍यांनी या बैठकीत दिला आहे.

प्रत्येक विभागाने योग्य नियोजन करून इतर विभागांची योग्य समन्वयेस ठेवावा. कोणत्याही विभागाने केलेली कुचराई खपवून घेतली जाणार नाही. पशुसंवर्धन विभागाने कोंबड्या,बकरी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी खंडाळा, सुरूर,वाई एमआयडीसी, कोचळेवाडी आणि मांढरदेव नाका या ठिकाणी पाच पथके नेमून पोलिसांच्या मदतीने निर्बंध घातले जातील.. दरम्यान या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शितल जानवे-खराडे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com