ताज्या बातम्या
पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या रुग्णालयातच महिलेचा मृत्यू, कारण नेमकं काय?
पुण्यातील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्ती धाम रुग्णालयामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावल्याने प्रसुतीगृहातून खासगी रुग्णालयात नेताना त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच प्रसूतीगृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयु नसल्याचे देखील समोर आलं आहे.
महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे