Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता, 27 गावांना दिलासा

Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता, 27 गावांना दिलासा

कल्याण-डोंबिवली शहरासाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाल्याने 27 गावांना दिलासा मिळणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे ही योजना मंजूर झाली.
Published by :
Prachi Nate
Published on

हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांनी 27 गावातील पाणी प्रश्नावर लक्ष देत सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना पाणी प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली होती, तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे, यांनी 27 गावात पाणी पुरवठा वाढवावा असे सांगितले होते.

याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत योजने'अंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरासाठी 357 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर चेतन मोरे, हेही उपस्थित होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने अखेर याला यश आले.

या योजनेला मान्यता मिळाल्याने कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट 27 गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून 105 दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. 27 गावातील वाढीव पाणी पुरवठ्याबाबत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, व कल्याण ग्रामीण मतदार संघांचे आमदार राजेश मोरे, यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, याला यश आल्याने नागरिकांनी आभार मानले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com