कल्याणचा पुढील खासदार मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही; आमदार राजू पाटील यांचा दावा

कल्याणचा पुढील खासदार मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही; आमदार राजू पाटील यांचा दावा

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. यामध्ये बहुतांश पदाधिकारी मंत्री आणि आमदारांची मुलं असल्याने या नियुक्त्यांवर घराणेशाहीचा आरोप झाला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. यामध्ये बहुतांश पदाधिकारी मंत्री आणि आमदारांची मुलं असल्याने या नियुक्त्यांवर घराणेशाहीचा आरोप झाला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'शिंदे गटात घराणेशाही नवीन कुठेय? सात-आठ वर्षे झाली, बघतोच आहोत आपण', असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला. तसंच हा त्यांचा प्रश्न असला, तरी प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे, असे राजू पाटील म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, "मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की," अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी नवरात्रौत्सव आयोजित केला होता. त्यावेळी ते तिथे भेट द्यायला आले होते.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पुढची निवडणूक ठाण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली, तर खासदार व्हायला आवडेल का? असं राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले ती, 'मी आमदारकीलाही उभा राहणार नव्हतो, राजसाहेब म्हणाले म्हणून उभा राहिलो, त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर राहणार. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेची दखल घेतल्याशिवाय, मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com