Shivneri ST Bus : 'कन्यादान' फेम शुभंकर-अमृताचा शिवशाही एसटीचा वाईट अनुभव; व्यवस्थापनावर गैरवर्तनाचा आरोप
लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’मधील जोडी शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांना स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बससेवेचा वाईट अनुभव आला. स्वारगेट येथून बोरिवलीसाठी त्यांनी ऑनलाईन तिकीट आरक्षित केले होते. मात्र, बस वेळेवर आली नाही आणि त्या ठिकाणी उपस्थित मॅनेजरने उद्धटपणे बोलल्याचा आरोप या कलाकारांनी केला आहे.
ते म्हणाले की, संबंधित मॅनेजरला आम्ही बस बद्दल माहिती विचारली असता त्यांना बस कधी येणार माहित नव्हतेच पण आम्ही जी सीट देणार तिथेच तुम्हाला बसावं लागेल असे देखील त्या म्हटल्या...त्यांनी हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत उघड केला असून, प्रवासी सेवेत सुधारणा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हा प्रसंग समोर आल्यानंतर एसटी महामंडळाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कलाकारांच्या या प्रतिक्रियेने सामान्य प्रवाशांच्या तक्रारींनाही वाचा फुटली आहे