कपिल पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?

कपिल पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?

शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यावेळी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यावेळी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही आहेत. त्याऐवजी ते मुंबईतून विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षक भारतीने सुभाष मोरे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे.

कपिल पाटील यांनी 2006 पासून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केलं आहे. आता शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यावेळी विधान परिषदेची निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे आता कपिल पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com