Sunjay Kapur
ताज्या बातम्या
Sunjay Kapur : करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन
करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे.
(Sunjay Kapur ) करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन झालं आहे. पोलो गेम खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे. वयाच्या 53व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
काही तासांपूर्वी संजय यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त करणारे ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटनंतर काहीच तासांनी त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने उद्योगपती संजय कपूर यांच्याशी 2003 मध्ये लग्न केले होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना समायरा आणि कियान अशी दोन मुले आहेत.