Admin
बातम्या
Karnataka Election 2023 : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, 13 मे रोजी निकाल
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (29 मार्च) पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.