Karnataka Election 2023 : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर
Admin

Karnataka Election 2023 : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर

कर्नाटक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मंगळवारी आपल्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा या यादीत समावेश आहे.

जगदीश शेट्टर यांनी हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.जगदीश शेट्टर यांनी भाजपकडे तिकीट देण्याची मागणी केली होती, मात्र भाजपाने तिकीट त्यांना दिले नाही. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक होत आहे.

काँग्रेसचे जगदीश शेट्टर - हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघ, दुर्गाप्पा एस. हुलागेरी - लिंगसुगुर , दीपक चिंचोरे - हुबळी-धारवाड-पश्चिम, मोहम्मद युसूफ सावनूर - शिगाव, नंदागावी श्रीनिवास - हरिहर, एच.डी. थम्मय्या - चिकमंगळूर , M.A. गोपालस्वामी - श्रवणबेळगोळ हे उमेदवार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com