कर्नाटक सरकारने सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे वगळले

कर्नाटक सरकारने सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे वगळले

सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटक मधल्या अभ्यासक्रमांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटक मधल्या अभ्यासक्रमांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत. तर त्या जागी नेहरूंचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे.

कर्नाटक सरकारच्या निर्णयावर भाजपानं टीका केली आहे. सिध्दरामय्या यांच्या सरकारने कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमामधून सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लागू केलेला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने घेतला.

इयत्ता सहावी ते दहावी इयत्तेच्या कन्नड आणि समाजशास्त्र या विषयांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह इतर काही जणांवरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

याआधी भाजपाचं सरकार कर्नाटकमध्ये होते. त्यावेळेस सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे होते. त्यानंतर सरकार बदलले आणि काँग्रेसचं सरकार आलं आणि सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे वगळले. आता यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com