Karuna Munde : मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत#$@& करावा, करुणा मुंडे ढसाढसा रडल्या

Karuna Munde : मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत#$@& करावा, करुणा मुंडे ढसाढसा रडल्या

करुणा मुंडे: धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना करुणा मुंडे ढसाढसा रडल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.
Published by :
Prachi Nate
Published on

करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना पंकजा पालवे म्हणत सत्तेसाठी लाचार असल्याचे आरोप केले आहे. औकात असेल तर कोर्टात हरवा, मंत्रिपद गेलं पण माज गेला नाही. 6 महिन्यात आमदारकी रद्द करणार, असं थेट चॅलेंज करुणा मुंडे यांचं धनंजय मुंडे यांना दिलं आहे. हे आरोप करत असताना त्या ढसाढसा रडल्याच देखील पाहायला मिळत आहे.

करुणा मुंडेचा सरकारवर निशाणा

तसेच त्यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की, या राज्याचं सरकार काही करत नाही आहे. एवढे आरोप केले, एवढ्या तक्रार नोंदवल्या तरी पोलीस यंत्रणा गप्प आहे. या राज्याच्या व्यवस्थेने बांगड्या भरलेल्या आहेत. त्यामुळे मी सुद्धा काही करु शकत नाही. हे सरकार तुम्हाला लाडक्या बहिणीच्या नावावर 1500 रुपये देऊ शकतो. असं म्हणत करुणा मुंडेंनी सरकारवर देखील बोट दाखवलं आहे.

करुणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

तसचं धनंजय मुंडेंवर आरोप करत करुणा मुंडे म्हणाल्या की, माझ्याकडे धनंजय मुंडे आणि त्यांच्या वकिलांचे रेकॉर्डींग आहे. संदर दिसतेस म्हणून मला 50 कोटींची ऑफर देऊन दुबईत घेऊन जायचं म्हटलं होत. हे सगळ मी लवकरचं फेसबूकवर टाकणार आहे. मला जर हेच सगळ करायचं असत ना तर मी कधीच पैसे घेऊन दुबईला सेटल झाली असती. बीडमध्ये येऊन धुळ खात नसती. तुम्हाला माझ्या चुकीच्या गोष्टींच्या व्हिडिओ हव्या आहेत ना, तर मग ठिक आहे. मी लवकरच परळीमध्ये राहायला येत आहे, माझ्यासोबत कोणीही बॉडिगार्ड नसतो. धनंजय मुंडेंचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत त्यांनी या आणि माझ्यासोबत #$@& करा आणि व्हिडिओ करा कारण तो तुमचा कमवण्याचा एक मार्ग आहे. असा आरोप करत करुणा मुंडे ढसाढसा रडल्या आहेत.

गोपीनाथ मुंडेंविषयी करुणा मुंडेंनी केला मोठा खुला

तसेच पुढे त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी फक्त मला बदनाम नाही केलं. ज्यावेळेस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये वाद सुरु होते त्यावेळेस धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते पंकजा मुंडेंबद्दल खुप वाईट बोलायचे. माझ्या घरात माझ्यासमोर सगळे कटकारस्थान रचायचे. एवढचं नाही तर त्यांनी गोपीनाथ मुंडेंचे देखील एका महिलेसोबत व्हिडिओ व्हायरल केले होते. ज्यांना लोक देव मानतात त्यांच्या बद्दल देखील त्या लोकांनी खुप काही वाईट पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा मोठा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com