Karuna Munde : 'वैष्णवीला मारहाण केल्यानंतर फासावर लटकवलं'; करुणा मुंडेंच वक्तव्य

करुणा मुंडे यांनीदेखील काल, शनिवारी कस्पटे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली.
Published by :
Rashmi Mane

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वैष्णवीचे आई-वडील, कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. त्यातच करुणा मुंडे यांनीदेखील काल, शनिवारी कस्पटे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या सासरच्या मंडळींवर टीका करत त्यांना कडक शिक्षा व्हावी, असं म्हटलं आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, "आजची युवा मुलगी आत्महत्या करू शकत नाही. वैष्णवीची पोस्ट मार्टम रिपोर्ट आले आहेत, त्यानुसार तिच्या शरीरावर पूर्ण मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे मला वाटतं की ही आत्महत्या नसून मर्डर केलेलं आहे. तिला मारून मारून तिचा जीव घेतला आणि नंतर तिला गळफास लावला गेला, असं वाटतं. जो वैष्णवीचा नवरा आहे, कमीत कमी त्याला तरी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जेणेकरून पुढे कोणी दुसरी वैष्णवी होऊ नये."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com