Karuna Sharma Vs Suresh Dhas: "धस यांना अडकवलं जातंय", करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप
नुकतीच आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाली. ही भेट रुग्णालयात झाली असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणल्याचं त्यांनी स्वतः म्हटलं होत. यावर सुरेश धस यांनी आपली बाजू मांडत ही भेट केवळ मंत्री धनंजय मुंडेंची विचारपूस करण्यासाठी करण्यासाठी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यावर अनेक राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळाले. अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया देखील देण्यात आल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर आता करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधत सुरेश धस यांना अडकवलं जात असल्याचा दावा केला आहे.
त्यांनी माघार घेतली तर...
याचपार्श्वभूमिवर करुणा मुंडे म्हणाल्या की, राजकारणी लोकांनी तोडाफोडीचं राजकारण सुरु केल आहे. संतोष देशमुख हत्या कांड प्रकरण लोकांनी धरून ठेवल असताना, आता या राजकारणात सुरेश धस यांना अडकल जात आहे. मात्र, सुरेश धस हे माघार घेणार नाही. त्यांनी माघार घेतली तर मी फडणवीसांना भेटायला जाणार.
मी सुद्धा तुरुगांत राहीली आहे, मला माहिती आहे तुरुगांत काय चालत. मी तुरुंगात काय होत हे सांगणार आणि मी माझ ब्रम्हास्त्र बाहेर काढेन, असा इशारा करुणा मुंडेंनी दिला आहे. तसेच याबाबत पुर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.