गणेशोत्सवात 100-150 कोटींचा खर्च; रश्मिका मंदाना, क्रीती सॅनोनसारख्या अभिनेत्रींना परळीत बोलावतात

गणेशोत्सवात 100-150 कोटींचा खर्च; रश्मिका मंदाना, क्रीती सॅनोनसारख्या अभिनेत्रींना परळीत बोलावतात

करुणा शर्मा यांनी रश्मिका मंदना व क्रीती सेनॉन यांच्यावर साधला आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नेहमीच उलथापालथ होताना बघायला मिळते. कॉँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांची राजकीय आयुष्यापेक्षा खासगी आयुष्य अधिक चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयातील खटला जिंकला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. गेले तीन वर्ष या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळले. हा खटला जिंकल्यानंतर धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्यात त्यावी याबद्दल असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर करुणा शर्मा यांनी 'लोकशाही मराठी' वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिनेत्री रश्मिका मंदना, क्रीती सेनॉन यांच्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांना रश्मिका मंदना व क्रीती सेनॉनसारख्या बड्या अभिनेत्री परळीसारख्या छोट्या गावामध्ये कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर त्या म्हणाल्या की, "रश्मिका मंदना व क्रीती सेनॉनसारख्या मोठ्या अभिनेत्री परळीमध्ये येऊन आय लव्ह यू परळी बोलण्याचे कोट्यावधी रुपये घेतात. दोन मिनिटांसाठी इतके पैसे का देतात? हा प्रश्नदेखील अनेकांना पडतो".

पुढे त्या म्हणाल्या की, "इतके पैसे आशा अभिनेत्रींना देण्याऐवजी परळीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. रस्ते सुधारणे, स्वच्छता गृह याकडे लक्ष द्यावे. मात्र इथे पैसा वेगळ्याच ठिकाणी वाया घालवला जातो. गणेशोत्सवामध्येही 100 ते 150 कोटी रुपयांचा खर्च केला जातोइतके पैसे खर्च करताना मी स्वतः बघितले आहेत. ". यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com