कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक; काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक; काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आज काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाविकास आघाडीकडून आज उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ही बैठक बोलावली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे.

त्याचदरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसकडून इच्छुक असलेले उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com