मनसेचा चिंचवड, कसब्यात भाजपला पाठिंबा
Admin

मनसेचा चिंचवड, कसब्यात भाजपला पाठिंबा

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने भाजपाला पाठिंबा दिला आहे.

मनसेनं या निवडणुकीसाठी तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र कालच मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले की, मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही. असे त्यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून टीका केली आहे. ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com