Election Duty
Election DutyElection Duty

Election Duty : मतदानाला जाताना त्रास नको! विशेष लोकल–बेस्टसाठी शिक्षक संघटनांचा आवाज

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण उभी राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत वाहतूक सुविधा नसल्यामुळे ड्युटीवर पोहोचणे आणि घरी परतणे कठीण होणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण उभी राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत वाहतूक सुविधा नसल्यामुळे ड्युटीवर पोहोचणे आणि घरी परतणे कठीण होणार आहे.

निवडणूक साहित्य वाटप, जमा करणे आणि अहवाल सादर करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. मतदानाच्या दिवशी तर पहाटेच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असते. मात्र या वेळेत लोकल, बेस्ट बस आणि मेट्रो सेवा बंद किंवा फारच मर्यादित असतात.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे. १४ व १५ जानेवारीच्या रात्री उशिरापर्यंत लोकल रेल्वे सुरू ठेवावी, तसेच मतदानाच्या दिवशी पहाटे लवकर विशेष फेऱ्या चालू कराव्यात. यासोबतच बेस्ट बस आणि मेट्रो सेवाही वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सवाल उपस्थित करत सांगितले की, उत्सवांसाठी मध्यरात्री वाहतूक दिली जाते, तर लोकशाहीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी ती का देता येत नाही? निवडणूक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थोडक्यात

  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता

  • मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत वाहतूक सुविधांचा अभाव

  • ड्युटीवर वेळेत पोहोचणे कठीण होण्याची भीती

  • मतदानानंतर घरी परततानाही अडचणींची शक्यता

  • विशेष लोकल व बेस्ट बस नसल्याने सुरक्षा आणि सोयीचा प्रश्न

  • यामुळे निवडणूक ड्युटी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com