Kerala : केरळच्या अष्टमुडी तलावात भीषण आग; 10 हून अधिक मासेमारी बोटी जळून खाक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kerala) केरळच्या अष्टमुडी तलावात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 10 हून अधिक मासेमारी बोटी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील अष्टमुडी तलावात रविवारच्या पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली.
स्थानिक लोकांनी सुमारे 1 वाजून 30 मिनिटांच्या आसपास ही आग लागल्याचे पाहिले असल्याची माहिती मिळत आहे. कुरिपुझा चर्चजवळ असलेल्या अय्यनकोविल मंदिराच्या जवळ ही आग लागली असून आग लागल्यानंतर लगेचच बोटींवर ठेवलेल्या अन्य गॅस सिलेंडरमध्येही स्फोट झाला यामुळे आग जास्त वाढल्याचे बोलले जात आहे.
या आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Summery
केरळच्या अष्टमुडी तलावात भीषण आग
10 हून अधिक मासेमारी बोटी जळून खाक
सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
