Khate Vatap Changes: महायुतीचे खाते वाटप जाहीर, खाते वाटपात काय बदल झाले; जाणून घ्या?

Khate Vatap Changes: महायुतीचे खाते वाटप जाहीर, खाते वाटपात काय बदल झाले; जाणून घ्या?

शिंदे सरकारच्या खातेवाटपात महत्त्वाचे बदल, भाजपकडे असलेले गृहनिर्माण खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे, अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि वैद्यकीय शिक्षण खाते, इतर मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल.
Published by :
Team Lokshahi
Published on

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडा उलटला. मात्र, राज्य खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अपेक्षेनुसार गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आलं आहे.

तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रायलयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृह निर्माण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यादरम्याने खाते वाटपात काही बदल झाले आहेत ते कोणते जाणून घ्या.

काय झाले बदल?

शिंदे सरकारमध्ये भाजपकडे असलेले गृहनिर्माण खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. तर शिंदेसेनेकडे पूर्वी असलेले उत्पादन शुल्क हे खाते अजित पवार यांच्याकडे गेले आहे. आधी भाजपकडे असलेले पर्यटन खाते हे शिंदेसेनेतील शंभूराज देसाई यांच्याकडे गेले आहे. वैद्यकीय शिक्षण हे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्याकडे तर उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम राहिले आहे.

तसेच अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खाते पुन्हा मिळाले असून गुलाबराव पाटील यांच्याकडे पूर्वीचेच पाणीपुरवठा व स्वच्छता खाते आले, तर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण खाते कायम राहिले. मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही कौशल्य विकास खाते कायम आहे.

उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते पुन्हा देताना पूर्वी दीपक केसरकर यांच्याकडे असलेले मराठी भाषा खातेही त्यांना देण्यात आले. गृहनिर्माण खाते भाजपने एकनाथ शिंदे यांना दिले. शिंदे सरकारमध्ये अतुल सावे यांच्याकडे हे खाते होते. आता सावे यांना पूर्वीचे ओबीसी कल्याण खाते देतानाच ऊर्जा (नवीनीकरणीय ऊर्जा), दुग्धविकास हे खाते देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com