Powai Children Kidnapping : पवईत 17 चिमुकल्यांच्या किडनॅपिंग, नेमकं काय घडलं?
थोडक्यात
पवईत 17 चिमुकल्यांच्या किडनॅपिंग
लहान मुले ऑडिशनसाठी आली होती
पालकांना समजताच उडाला गोंधळ
मुंबईत गजबजलेल्या परिसरात आरए नावाच्या स्टुडिओत सधारण 20 मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने या मुलांना डांबून ठेवले होते अशी माहिती समोर आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच कारवाई केल्यानंतर या मुलांना सुखरुपणे बाहेर काढण्यात आले आहे.
मात्र या मुलांना नेमके कसे डांबून ठेवले? तसेच मुलांना डांबून ठेवलेले आहे, हे नेमके कसे समजले याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या स्टुडिओच्या बाहेर उभा असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने या सर्व घटनेबाबत सांगितले आहे. मुलांना डांबून ठेवण्याचे रोहित आर्याचे धाडस नेमके कसे झाले? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केली आहे. सोबतच आरए स्टुडीओच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती होती? पोलिसांनी नेमकं काय केलं? याबाबतही या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सविस्तर सांगितले आहे.
लहान मुले ऑडिशनसाठी आली होती
डांबून ठेवलेल्या सर्व मुलांना आता सुखरुपणे बाहेर काढण्यात आले आहे. या मुलांसोबत आता पालकही आहेत. साधारण 17 मुलांना डांबून ठेवण्यात आल्याचे वाटत आहे. यात कोणी वसई, वाशी, पनवेल अशा वेगवेगळ्या भागातून ही लहान मुले ऑडिशन देण्यासाठी आली होती. ही सर्व मुलांचे वय 15 वर्षांपेक्षा कमीच आहे. आम्ही तुम्हाला चित्रपटात काम देऊ, असे सांगून या मुलांना बोलवण्यात आले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
पालकांना समजताच उडाला गोंधळ
पुढे बोलताना, ऑडिशन असेल तेव्हा जेवणासाठी मुलांना बाहेर सोडलं जातं. आज या मुलांना जेवणासाठी सोडलंच नाही. त्यानंतर या मुलांना डांबून ठेवण्यात आल्याचं समजलं. ही बाब समजताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर पालकांनाही आमच्या मुलांना डांबून ठेवण्यात आल्याचे समजले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. मुलांना डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीची नेमकी मागणी काय होती? याबाबत फक्त पोलिसांनाच कल्पना असेल, असेही त्याने सांगितले.
आरए स्टुडिओ पूर्ण पॅक, काहीच दिसत नाही
मुलांना डांबून ठेवल्यानंतर पालक घाबरलेले होते. काचेमधून मुलं दिसत होती. मुलं काचेतून पालकांना हात दाखवत होती. संपूर्ण स्टुडिओ हा पूर्णपणे पॅक आहे, असे सांगत ऑडिशन घेणारा रोहित आर्या कोण आहे? याची चौकशी करायला हवी, अशी मागणीही प्रत्यक्षदर्शीने केली.
सहा दिवसांपासून चालू होती शूटिंग
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आरए स्टुडिओत शुटिंगचा हा सहावा दिवस होतं. दहा वाजेपासून ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत मुलं स्टुडिओत असायची, अशी माहिती आता समोर आल आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
