'उबाटा शिल्ल्क सेनेचा हा “अपचननामा” प्रसिद्ध' शिंदे गटाची टीका

'उबाटा शिल्ल्क सेनेचा हा “अपचननामा” प्रसिद्ध' शिंदे गटाची टीका

लोकसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा गुरुवारी (२५ एप्रिल) जाहीर करण्यात आला.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीसाठीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा गुरुवारी (२५ एप्रिल) जाहीर करण्यात आला. याच वचननाम्यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी हल्लाबोल केला आहे. या वचननाम्यात फक्त पिता पुत्राची मोठे फोटो होते पण बाळासाहेब ठाकरे यांचे नाव छोट्या अक्षरात लिहले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा जाहीरनामा वाटावा असं त्यात काहीच दिसलं नाही असं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले किरण पावसकर?

नवीन रोजगार देण्याचे जे सांगता ना त्याहीपेक्षा तुमच्या युनियनमुळे ज्यांचे रोजगार गेले त्यांना त्यांचे रोजगार परत द्या. उद्योग गुजरातकडे गेले असं म्हणायचं आणि युनियन माध्यमातून सगळे रोजगार हिसकावून घ्यायचे. महिलांचा सन्मान म्हणून सुद्धा चार ओळी ठाकरेंच्या वचननाम्यात आहे. मला तर हे वाचून हसू आलं.

पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडी काळात कंगना रणावत बद्दल तुम्ही काय बोललात. केतकी चितळे वर atrocity लावण्यात आली. शिवसैनिकांना न पटणार असा हा ठाकरे गटाचा उबाटा शिल्ल्क सेनेचा हा “अपचननामा” प्रसिद्ध करण्यात आला. या वचननाम्यामध्ये साध बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाही. हा कॅाग्रेससोबतचा माफीनामा होता. बाळासाहेबांना भारतरत्नं देण्याची साधी मागणी देखील यात नव्हती.

ज्यांच्या सोबत आघाडी करून राहीलेत ते शरद पवार साहेब बोलतात की मी सर्वाधिक काळ सभागृहात उपस्थितीत रहीलोय. मागच्या एवढ्या वर्षात किती जाहीरनामे काढलेत तरी आता पुन्हा त्याच मागण्या त्यांच्या वचननाम्यामध्ये आहेत.

ठाकरे गटाचा वचननाम्यामध्ये जे उद्योग आणू म्हणून सांगितले आहेत त्यांना विचारायचे आहेत. तुमच्या मुळे किती रोजगार गेला हे सांगा..? दूतोंडी भूमीका आहे यांची महीलांचा कीती सन्मान ठेवलात…? जशी यापूर्वी तुम्ही अजाण पठण स्पर्धा ठेवली होती तशीच आता जनाब उद्धव ठाकरे यांनी आता टोमणे स्पर्धा ठेवली पाहीजे.

समान नागरी कायदा ही मागणी बाळासाहेबांची होती. पण आता राहूल गांधी सोबत राहून तुम्ही समान नागरी कायदा कसं मागणार..? ठाकरे गटाचा वचननामा हा खरतरं अपचननामा आहे.

राम राम हे आधीपासून म्हंटले जाते पण तुमच्या मनात जर हे राम आलं असेल तर काय म्हणायचं. उद्धव ठाकरे यांच्या वचननामा जाहीर का त्याची प्रत पहिली. शिवसैनिकांना अपचन नामा दिसला. मशाल चिन्ह दाखवल तरी ते चालणार नाही. वचननाम्यात शरमेची गोष्ट आहे. या वचन नाम्यात बाळासाहेबांचं नाव नाही, हिंदुत्व नाही, सावरकरांचं नाही. हा वचननामा उबाठाचा नसून राहुल गांधी यांचा माफी नामा आहे.

'उबाटा शिल्ल्क सेनेचा हा “अपचननामा” प्रसिद्ध' शिंदे गटाची टीका
'मतदानाच्या दिवशी ईव्हीएम बंद पडणं हे भाजपचं कटकारस्थान' संजय राऊत यांची टीका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com