Kiran Samant : किरण सामंत यांनी घेतली फडणवीसांची भेट; कारण काय

Kiran Samant : किरण सामंत यांनी घेतली फडणवीसांची भेट; कारण काय

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीतील रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

या जागेसाठी अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही आहे. याच पार्श्वभूमीवर किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी किरण सामंत इच्छुक असल्याचे बोललं जात आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com