Kirit Somaiya sanjay raut
Kirit Somaiya sanjay rautadmin

दुसऱ्या क्लीन चिटबद्दल ऐकलं तर संजय राऊतांच्या घरी भूकंप येईल - किरीट सोमय्या

आयएनएस विक्रांत निधी अपहार आणि शौचालय घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाली.
Published by :
Siddhi Naringrekar

आयएनएस विक्रांत निधी अपहार आणि शौचालय घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाली. यावरुन किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.

सोमय्या म्हणाले की, . संजय राऊत ज्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला यासाठी डेकोरेटवर दबाव आणला म्हणून बोंबलत होते, त्या मुलीचे ते सासरे आहेत. त्यांनीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे,” “क्लीन चिटबद्दल ऐकलं तर संजय राऊतांच्या घरात भूकंप येईल. सोमय्या कुटुंबाने१०० कोटींचा टॉयलेट घोटाळा करत घाण केल्याचं ते म्हणत होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण कोणी केली?,” असा सवाल सोमय्या यांनी राऊतांना विचारला आहे.

तसेच “किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठान निर्दोष असल्याची सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे होती. आम्ही कायदेशीर नोटीस दिल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी क्लीन चिट दिली. संजय राऊतजी तुमच्या व्याहींनी क्लीन चिट दिली आहे. आता संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर राजेश नार्वेकरांवर आरोप करावेत. राजेश नार्वेकर विकले गेलेत म्हणावं. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठका घेतल्या की नाहीत हे सांगावं. राजेश नार्वेकर यांनी विश्वासघात केला, खोटा रिपोर्ट दिला हे सांगावं. हे क्लीन चिट खरं आहे की खोटं याची माहिती त्यांनी द्यावी,” असे म्हणत किरीट सोमय्या यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com