किरीट सोमय्या
किरीट सोमय्याटीम लोकशाही

घोटाळे बाहेर काढणारच! किरीट सोमय्या यांनी ‘या’ 5 नेत्यांची नावं केली जाहीर

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे.

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मिडियावर ट्विट करत आपले नव्या वर्षातील निशाणे कोण असणार ते सांगितले आहे.

त्यांनी ट्विट करुन सांगितले की, उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, यासह हसन मुश्रीफ, अस्लम खान आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

नवीन वर्षात नवीन घोटाळे बाहेर काढणारच असा त्यांनी इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com